आनंदाचा शिधा देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Foto
आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईमध्ये याबाबत घेतली भेट

सिल्लोड, (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी साखर, तेल, रवा, डाळ आदी अत्यावश्यक किराणा साहित्याचा आनंदाचा शिधा राज्यातील जनतेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार
यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे की, सिल्लोड सोयगाव तालुक्यासह राज्यातील अनेक भागांत यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यातच दसरा व दिवाळीचे सण तोंडावर आले आहेत.

यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला सणासुदीला अत्यल्प दरात साखर, तेल, रखा, डाळ आदी अत्यावश्यक किराणा साहित्याचा आनंदाचा शिधाफ उपलब्ध करून देण्यात आला होता. 

त्याच धर्तीवर यंदाही दुष्काळी परिस्थितीचा विचार करून ङ्गआनंदाचा शिधाफ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.